काजेगाव येनगाव ग्रामसेवा सहकारी संस्था मर्यादित काजेगाव र.न.३०९ निवडणूक दिनांक २ जुलै रोजी पार पडली. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार पँनलचा दणदणीत विजय झाला.यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघात रमेश वायझोड़े १३४ (विजय) - रघुनाथ वाघ ७४ मते(पराभव), मागासवर्गीय मतदारसंघात महादेव भारसाकळे १४३ (विजय) -फूलचंद दाभाडे ६१ मते (पराभव), भटक्या जाती विमुक्त जमाती मतदारसंघात रामदास जुमळे १४१(विजय) - राघु बरिंगे ६४ मते (पराभव), महिला राखीव मतदारसंघात शिल्पा दत्तात्रय वाघ १४५ मते (विजय),सिंधुबाई श्रीराम वायझोड़े ७४(विजय),कल्पनाबाई नंदकिशोर वाघ ५९ (पराभव),सर्वसाधारण मतदारसंघात विठ्ठल वाघ १४४ (विजय),त्र्यंबक वाघ १४४ (विजय),मनोहर वाघ १३९ (विजय),रामराव वायझोड़े १३९ (विजय),अशोक वायझोड़े १३९ (विजय),रविंद्र वाघ १३७ (विजय),युवराजसिंह ठाकुर १३४ (विजय),मोहम्मद सादिक १२६ मते (विजय) विरुद्ध किसन दातकर ६० (पराभव),समाधान शेळके ५८ (पराभव),विनायक वाघ ५३ (पराभव),विनोद वाघ ५३ (पराभव),विलास कुकडे ५३ (पराभव),अण्णासिंह बायस ५२ (पराभव),महेंद्र धंदर ५० (पराभव),हरिदास वानेरे ५० मते (पराभव) असा प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय झाला. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी निवडून आलेल्या सर्वांचा सत्कार केला. विजयी झालेल्या उमेदवारांनी काजेगाव येनगाव येथील ग्रामस्थाचे आभार मानले.
काजेगाव येथील ग्रामसेवा सहकारी संस्था (सोसाइटी) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार पँनलचा दणदणीत विजय...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
