हिवरखेड पोलिसांनी केले वेगवेगळे ठिकाणी गौमास जप्त, बेलखेड येथील घटना,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलखेड येथे गोपनीय माहितीवरून हिवरखेड पोलिसांनी धाड टाकली असता बेलखेड येथील  अंबिका माता मंदिर जवळ आणि गोरधा फाट्यावर बेलखेड येथील कुरेशी पुऱ्यातील आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आले, एका आरोपी जवळ  गौमास तुकडे ७५ की ,लो  वजनाचे अंदाजे किंमत १५००० हजार रुपये  दोन लाल रंगाच्या हिरो होंडा मोटरसायकली एकूण ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,तर  दुसऱ्या कारवाईतील आरोपी जवळ ७० किलो मास मिळवून आले, अंदाजे किंमत १४ हजार रुपये  दोन बजाज प्लॅटिना एकूण मुद्देमाल ५९ हजार रुपयांचा जप्त करण्यात आला, आरोपी शेख कययुंम शेख महेबुब ,वय ३८ वर्षे , रा कुरेशी मोहहला बेलखेड,शेख इमाम ,शेख तुकडू, वय  ४७ वर्षे, रा बेलखेड,  शेख नासिर शेख रउफ, रा बेलखेड,  यांच्या विरुद्ध कलम ४२९  भा,द, वि, ५,५ ( क) ९,९(अ) प्राण्यांचे संरक्षण अधिनियम अनवये गुन्हा दाखल करण्यात आला,पुढील तपास हिवरखेड ठाणेंदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली     पोलीस उपनिरीक्षक संदीप बालोद, हे कॉ, प्रवीण गवळी, प्रदीप तायडे, आशिष साबळे करीत आहेत,

Previous Post Next Post