बोराळा खुर्द येथे कृषी संजीवनी सप्ताह' उत्साहात साजरा...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित व सातपुडा शिक्षण संस्था द्वारा संचालित स्वा. गणपतराव इंगळे कृषि व उद्यान विद्या महाविद्यालय, जळगांव जामोद च्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला. यामध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून लाभलेले श्री. प्रताप मारोडे यांनी शेतकऱ्यांना फवारणी, मित्र किटके, आधुनिक शेती, खतांचा संतुलित वापर तसेच सेंद्रिय शेती इत्यादी. विषयांवर संवाद साधला. या कार्यक्रमाला बोराळा (खु.) गावच्या  सरपंच सौ. सुरेखाताई तिजारे, उपसरपंच श्री. संजय वाघ, माजी पोलीस पाटील श्री.प्रल्हाद वाघ, श्री. उज्वल पान्हेरकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई, कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे, कार्यक्रम समन्वयक प्रा. विद्या कपले यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमामध्ये गौरव मिसळकार, स्वराज बागडे, यश इंगळे, वैभव कुलकर्णी, ओम देशमुख, समर्थ गाडे,  कुणाल मोहोकार, मोहमद रेहान, वैभव मोरे, अजिंक्य भांबेरे, महेश आंधळे, सागर काटे, प्रवीण क्षिरसागर, श्रेयस महल्ले, निखील खोब्रागडे, ऋतिक कऱ्हाडे, दीपक कान्हेरकर, गोपाल पवार, प्रणव मोरखडे, यज्ञनेश नागोलकर, पुष्पक परतेकी, अमोल काळे, अनिकेत धनोकार, श्रेयस फुलारी, वैभव फुसे, चेतन डीवरे, रोशन धोटे,इत्यादी. कृषीदुतांनी कार्यक्रम आयोजित केला तसेच शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

Previous Post Next Post