राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नवी दिल्ली यांनी ऑगस्ट 2013 मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार व्याघ्र प्रकल्पामध्ये किमान तीन महिने व जास्तीत जास्त पाच महिने वन्यप्राणी विशेषता हा कालावधी वाघांचा प्रजनन कालावधी असल्याने तसेच वन रस्त्याची व त्यांच्या दुरुस्तीची परिस्थिती विचारात घेऊन यासह व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता विचारात घेऊन कोर क्षेत्रातील पर्यटन बंद ठेवण्याच्या सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांना प्राप्त झाल्याने त्यानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर व मुख्य वन संरक्षक तथा शेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून निर्गमित आदेशाच्या अधीन राहून दिनांक एक जुलै 2022 पासून कोअर क्षेत्रातील पर्यटन पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून येथील सर्व जिप्सी चालक व पर्यटक यांनी या विषयाची नोंद घ्यावी असे पत्र चिखलदरा वनपरिक्षेत्रात प्राप्त झाल्याने मागील काही दिवसांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया व वृत्तपत्रात पर्यटना संबंधी चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली होती त्या माहितीला कोणतेही नागरिकांनी बळी पडू नये असे वनविभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटकांची सुरक्षितता विचारात घेऊन तसेच रस्त्याची व त्याच्या दुरुस्तीची परिस्थिती विचारात घेऊन यासह वाघांचा प्रजनन काळ असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी एक जुलैपासून करण्यात आला बंद...
सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी
