चिखलदरा तालुक्यातील गिरगुटी व कुलंगना येथून शेती काम करण्यासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या कुझर गाडीला आज स दि. २७/७/२०२२ ला सकाळी आठ वाजताच्या सुमारास टेबुरसोंडा जवळ झालेल्या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला तर १५ ते २० मजुर जखमी झाले आहेत.चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत टेबुरसोंडा पोष्ट बेसिक कन्या आश्रमशाळेच्या वळण रस्त्यावर चालक ईश्वर धांडेकर रा. अबांपाटी याचे गाडी वरुन नियंत्रण सुटल्याने कुझर रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात सुरेश हिरालाल जामुनकर (३०) रा. गिरगुटी याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच टेबुरसोंडा गावातील नागरीक मदतीला धावत आले व जखमींना टेबुरसोंडा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.त्यानंतर अपघातातील महीला पुरुषांना अचलपूर येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच गभिंर जखमीना अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे.जखमी असलेले मजुरांमध्ये प्रिती लक्ष्मण बेलसरे ३५ कुलगंणा, पदमा किशन बेलसरे १९ वस्तापुर, बाबूलाल लक्ष्मण बेलसरे २८ वस्तापुर, सुकलाल लक्ष्मण बेलसरे ३३ वस्तापुर, अनिता सुकलाल बेलसरे २३ वस्तापुर, अंजु संजु कास्देकर २३ कुलगंणा, संजय रामप्रसाद बेलसरे १७ कुलगंणा, शंकर गंगाराम कास्देकर १९ कुलगंणा, सुमदी साहु सावरकर ४५ कुलगंणा, लक्ष्मी शिवलाल कास्देकर ४० कुलगंणा, सुनिता किसन कास्देकर ४० कुलगंणा, ललिता रामराव कास्देकर ६४ वस्तापुर, बेबी राजकुमार कास्देकर २३ कुलगंणा, यांच्या वर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असुन अन्य जखमींना अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे. या अपघातातील एक महीला गभिंर असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. हे सर्व मजुर कुझर गाडी क्रमांक एमएच २७ एससी ०३५७ ने चौरामल येथे शेतातील निदन कामासाठी जात होते. महीला मजुर कुझर च्या आत तर काही पुरुष मजुर कुझर गाडीच्या टपावर बसून जात होते. चालक हा नशा करून गाडी चालवत होता अशी माहिती जखमी महीला कडून प्राप्त झाली आहे.
मजुरांना घेऊन जाणाऱ्या कुझरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यू..१७ मजुर जखमी...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी....
