राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
चिखलदरा तालुक्यातील जामलि (राजस्व) येथील अल्पभूधारक शेतकरी ताणू पुण्या बेलसरे वय (५५) वर्ष यांनी सत्ततची नापिकी व कर्जाला कंटाळून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याने सर्व जामली गावात शोककळा पसरली आहे.जामली येथील प्रतिष्ठित नागरिक व अल्पभूधारक शेतकरी ताणू पुण्या बेलसरे यांचेवर बँकेचे कर्ज थकीत असून व दरवर्षीची नापिकी होत असल्याने व यावर्षी ही अतिवृष्टी झाल्यानें शेतातील पीक पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.आता कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असताना त्यांच्या मनावर काय परिणाम झाले हे कुणालाही समजले नाही. व त्यानी रात्री अचानक घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली .ताणू पुण्या बेलसरे हे गावातील सर्व सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन इतरांना नेहमी मार्गदर्शन करीत असत .गावात एकोपा ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
