मेळघाट मध्ये अतिवृष्टीने शेकडो हेक्टर जमीन खरडली...गिरगुटी गावा जवळील नवीन पुल वाहून गेल्याने रस्ता बंद वाहतूक खोळंबली....


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाट मधील चिखल दरा तालुक्यातील खोंगडा, गिरगुटी अंबापाटी  या परिसरात अतिवृष्टी झाल्यानें नदी नाले दुठडी भरून महापूर आल्याने नदी नाल्याच्या काठावरील शेकडो हेक्टर जमीन  खरडून वाहून गेल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले . गिर्गुटी गावाजवळ नवीन पुलाचे बांधकाम झाले असून ठेकेदार यांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने व बाजूचे काम योग्य पद्धतीने न केल्याने दोन्ही  बाजूवाहून गेल्या आहेत.त्यामुळे धर नी परतवाडा व पत्रतावडा अकोट या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे . दहा वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस आज आल्याने डोंगरावरील शेतीही पूर्णतः वाहून गेली आहे .या वर्षी सुरवातीला पाण्याने दांडी मारली नंतर काही दिवसांनी थोडफार पाऊस आला त्यात लोकांनी पेरण्या केल्या काहीच्या पेरण्याही अयशस्वी झाल्या . त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला व आज सकाळीं अचानक तीन वाजता पासून पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे नद्यांना महापूर आले .नदी काठच्या शेतातून मोठ्या प्रमाणात पुर गेल्याने काठावरील शेती वाहून गेली आहे .त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रचंड आर्थिक नुकसान झाले .तलाठी निलेश पटेल यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी स्थळावर जाऊन पाहणी केली . व तहसिलदार चिखलदरा यांना याबाबत माहिती आहे.आदेश येताच पंचनामा केला जाईल असे त्यांनी सांगितले.

Previous Post Next Post