हिवरखेड पोलिसांनी आकोट रोडवरील मोराळी मार्गावर दिनांक ३०, जुलैच्या च्या सकाळी गोपनीय माहितीवरून नाकाबंदी केली असता, त्यांना जिवंत पाच गायी व एक छोटे वासरू अवैध रित्या जखमी अवस्थेत नेत असतांना आढळून आले, जनावरे घेऊन जाणाऱ्या आरोपींना विचारांना केली असता त्यांनी रहेमत अली ईदातअली तळेगांव रोड हिवरखेड या त्यांच्या मालकाच्या सांगण्यावरून नेत असल्याची ग्वाही दिली ,यावरून हिवरखेड पोलिसांनी जनावरांनसह दोन आरोपीना ताब्यात घेतले ,सर्व मुद्देमाल अंदाजे ५० हजार रुपयांचा जप्त करण्यात आला,आरोपीं हे कत्तली करिता ह्या गायी नेत असल्याने आरोपी ऊब्बेदुन नईमोद्दीन वय २२ वर्षे, सादिक अली अफजलअली वय ३० वर्षे रा हिवरखेड या तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिवरखेड पोलिस स्टेंशनचे ठाणेंदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार महादेव नेवारे,विनोद गोलाईत,गिरीधर चव्हाण,सर्व्हेश कांबे,श्रीकृष्ण सोळंके,प्रदीप तायडे, आशिष साबळे,विनोद इंगळे हे करीत आहेत,
हिवरखेड पोलिसांनी दिले ५ गायी व एका वासराला जिवनदान,जप्त केलेल्या अवैध गुरांन मध्ये सर्व जिवंत गायींचा समावेश,
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....
