जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील मराखेड बुद्रुक येथे दिनांक 30 जुलै रोजी सुपेश वासुदेव खंडेराव या 17 वर्षीय तरुणाचा पाण्यामध्ये बुडवून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, सदर घटनेची तक्रार संतोष बाबुराव जवंजाळ वय 38 वर्ष राहणार मराखेड बुद्रुक यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. सविस्तर असे की मराखेड बुद्रुक येथील सुपेश खंडेराव व त्याचा चुलत भाऊ नागेश खंडेराव हे त्यांच्या जवळील म्हशी चारण्यासाठी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावाजवळील बेंबळा नदीच्या काठी गायरानात गेले होते. सुमारे पाच वाजेच्या सुमारास सुपेश हा नदीमध्ये बुडाला असल्याचे गावातीलच गजानन घोंगे यांनी संतोष जवंजाळ यांना सांगितले असता संतोष जवंजाळ व शहादेव खंडेराव हे दोघेही पळत नदीजवळ गेले असता त्यांना नागेश खंडेराव हा दिसला व त्याने सांगितले की सुपेश हा नदीतील डोहाच्या पाण्यात बुडाला आहे त्यामुळे जवंजाळ ढसहकाऱ्यांनी पाण्यात बुडालेल्या सुपेश खंडेराव याचा शोध घेणे सुरू केले नंतर सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास सुपेश खंडेराव हा नदीच्या डोहातील पाण्यात दिसून आला असता त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासले असता सुपेश ला मृत घोषित केले. मृतक सुपेश चे शव शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. सुपेशाच्या अशा या अकाली झाल्याने संपूर्ण मराखेड बुद्रुक गावावर शोककळा पसरली.. सदर घटनेची फिर्याद मिळतात जळगाव जामोद पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमदार इरफान करीत आहेत.
