बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याची असलेल्या पळशी सुपो या ग्रामीण भागात जि.प.शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शेतकरी कुटुंबातील पत्रकार गजानन कोकाटे पाटील यांचा मुलगा रोशन कोकाटे यांने मे 2022 मध्ये झालेल्या चार्टर अकाउंट C.A. परीक्षेत दोन्ही ग्रुप एकत्र देऊन यश संपादन केले. वयाच्या 21 व्या वर्षी C.A. झाला त्यामुळे सर्व स्तरातून याचे विशेष अभिनंदन व सत्कार होत आहे. तसेच पिंपळगाव काळे ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा रोशन गजानन कोकाटे यांने C.A. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल रोशन व त्यांच्या आई वडिलांचा पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी या सत्कार कार्यक्रमाला. माजि जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील. माजि जिल्हा परिषद सदस्या पूजाताई प्रकाश पाटील. ग्रामपंचायत सरपंच प्रीतीताई तायडे. उपसरपंच भारतीताई बांगर. माजी सरपंच आशाताई कळसकार. माजि उपसरपंच यशोदाताई घटे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण गवई सर. ग्रामपंचायत सदस्य. सचिन जाधव.अजय ताठे.नवलसिंग मावळे.शेख हारून अत्तार.नवल गोतरकर. अशोक ढोले. वंदनाताई निकम. उषाताई चौखंडे.महादेव घुटे.विनायक पाटील. श्रीकृष्ण वानखडे.हरिदास वाघमारे. सुपडा पाटील. मनू पाटील.अमोल बांगर. गोपाल तायडे. सुभाष पाटील.सुनिल काकडे. सुनिल कळस्कार.मयुर राऊत.पिंटु भालेराव.उमेश मांडोकार.सुरेश चोखंडे.बालु निकम. महिंद्रा बांगर. इत्यादी व गावकरी उपस्थित होते.सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी.गौरी प्रकाश पाटील हिने यशस्वीरित्या केले.
पळशी सुपो येतील बहुजन समाजातील पहिला सी.ए.रोशन कोकाटे याचा पिंपळगाव काळे ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार..
मंगल काकडे.जळगांव जा. तालुका प्रतिनिधी..
