हिंदूहृदयसम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा दिल्ली येथील लोकसभेच्या नविन सेंट्रल व्हिस्टा या इमारत परिसर मध्ये बसविण्यात यावा,अशी मागणी शिवसेनेचे खासदार प्रतापरावजी जाधव यांनी मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे केली आहे,याविषयीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांना दिले आहे.
५०० विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत अभ्यासिका उभारा...
दिल्ली येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातून तरुण-तरुणी जातात.स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून देशसेवेसाठी मराठी टक्का वाढावा म्हणून दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करण्याऱ्या आणि खास करुन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरिब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी ५०० विद्यार्थी बसतील.अशी अद्ययावत अभ्यासिका बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नवीन महाराष्ट्र सदन किंवा जूने महाराष्ट्र सदन येथे सुरू करण्यात यावी,अशी मागणी राज्यातील शिवसेना खासदारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र जी फडणवीस यांच्या केली आहे.
