जळगाव जामोद नगर परिषदेचे माजी नगरसेवक रमेश ताडे यांचा रसलपुर रोडवर नागवेली पोल्ट्री फार्म असून त्या पोल्ट्री फार्म मध्ये दिनांक 29 जुलै रोजी पाच फूट लांबीचा अत्यंत विषारी असलेला कोब्रा जातीचा साप निघाला होता. माजी नगरसेवक रमेश ताडे यांना माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब सर्पमित्र शरद जाधव यांना कॉल करून बोलावून घेतले असता सर्पमित्र शरद जाधव यांनी सापाला पाहता क्षणी सांगितले की हा कोब्रा जातीचा सापासून अत्यंत विषारी आहे त्यामुळे तुम्ही सावध रहा. सर्पमित्र शरद जाधव यांनी त्या कोब्रा जातीच्या सापाला अत्यंत चपळपणे पकडून एका भरणी मध्ये जेरबंद केले व माजी नगरसेवक रमेश ताडे यांच्या गाडीमध्ये त्याला सातपुडा पर्वतामध्ये सोडून देण्यात आले. माजी नगरसेवक रमेश ताडे हे नेहमीच प्राणीमात्रावर दया करीत असतात त्यामुळे त्यांनी या सापाला सुद्धा सर्पमित्र शरद जाधव यांच्या हस्ते जीवनदान दिले.
माजी नगरसेवक रमेश ताडे यांच्या नागवेली पोल्ट्री फार्म मध्ये निघालेल्या कोब्रा सापाला दिले जीवनदान...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
