मागील तीन-चार वर्षापासून निसर्ग हा शेतकऱ्यावर कहर करत असल्यामुळे शेतकरी हैराण झालेला होता. यावर्षी सुद्धा सुरुवाती पासून संत धार पाऊस चालू असल्यामुळे यंदाची पिके खराब होतात की काय? असा प्रश्न तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे.परंतु काही शेतकरी आपल्या मेहनतीच्या जोरावर पिकाची चांगली मेहनत करून चांगले उत्पन्न घेण्याच्या तयारीत असतात परंतु एवढी मेहनत करून सुद्धा वन्यप्राणी मात्र शेतकऱ्यांना तोंडी आलेला घास खाऊ देत नसल्याचे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आला.अशातच तालुक्यातील मौजे गोळेगाव या गावातील शेतकरी संगीता विठ्ठल घुळे यांनी त्यांच्या मालकीच्या शेतीमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती. संपूर्ण सोयाबीन पीक सारख संपूर्ण शेतामध्ये हिरवगार बहरत होतो. परंतु काल दिनांक २६ जैलैच्या रात्रीला काही वन्य प्राण्यांनी त्यांच्या शेतातील एक ते दीड एक्कर शेतीमधील सोयाबीन तूर पिक खाऊन जमीनदोस्त केले.अशा या महागाईच्या काळामध्ये ज्या शेतमावलीच्या भरोशावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. त्याच शेतातील सोयाबीन तुरीचे पीक जर वन्य प्राणी खाऊन नुकसान करत असतील तर शासनाने तात्काळ या शेतकऱ्याच्या पिकाचा पंचनामा करून या शेतकऱ्याला मदत द्यावी.
गोडेगाव शेतशिवारातील शेतकऱ्याचे दिड एकरातील सोयाबीन पिक वन्य प्राण्यांनी केले जमीन दोस्त...
जळगाव जा. प्रतिनिधी:-
