तिवसा तालुक्यातील श्री. क्षेत्र सार्शी (गाईची) या गावातील पार्वती गो-माता संस्थांची श्रद्धा असलेल्या देवगाईचा आज सकाळी 5:20वाजता दरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे, अनेक वर्षापासून गाईला पूजन्याची परंपरा असल्याने गाईची अंत यात्रा काढून मंदिराच्या पायथ्याशी गाईला समाधी देण्यात आली.. विदर्भातचं नव्हे तर राज्यात एकमेव गाईचे मंदिर असणारे गाव अशी ओळख तिवसा तालुक्यातील सार्शी (गाईची) येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या वंशज असलेल्या गाईचा (वय५वर्ष अंदाजे) काल सकाळी आजाराने मृत्यू झाला,त्यामुळे अख्ख्या गावात शोककळा पसरली असून गावात हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत गाईची अत्यंयात्रा निघाली होती,पार्वती माता देवस्थान सार्शी प्रसिद्ध असलेल्या पार्वती मातेची वंशज असलेल्या या गावाला 17 व्या शतकापासून पार्वती मातेमुळे अशी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी प्राप्त झाली असून दरवर्षी पौष पौर्णिमेला गौमातेचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो,एका गाईपासून तिचे वंशज आज गावात असल्याने गावातील मंडळीकडून गाईची पूजा केली जाते, मात्र गेल्या काही दिवसापासून यातील एका आजार झाल्याने सकाळी पार्वती मातेच्या वंशज असलेल्या गाईचा मृत्यू झाला त्यामुळे या गाईची बैलबंडी तून भजन-कीर्तन सह अंत्ययात्रा काढून पार्वती गो-मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी समाधी देण्यात आली.माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री पुष्पलता भैय्यासाहेब ठाकूर यांनी गाईला श्रद्धांजली वाहिली यावेळी माजी समाज कल्याण सभापती दिलीप काळबांडे, तिवसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष योगेश वानखडे, पंचायत समिती सदस्य कल्पना दिवे, सतीश पारधी,जितू ठाकूर,नगरसेवक अमर वानखडे,संजय चौधरी,राष्ट्रवादीचे सुनील वऱ्हाडे, हेमंत बोबडे, लढा संघटनेचे संजय देशमुख,तळेगावचे पोलीस पाटील किशोर दिवे,बंडू मंजु,विकी वानखडे,रोशन ठाकरे व पार्वती माता संस्थाचे पदाधिकारी,विश्वस्त यासह मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्त तसेच गावातील नागरिक उपस्थित होते..
----------------------------------------- १७ व्या शतकापासून गावात गाईला पूजण्याची परंपरा असून गावाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी प्राप्त झाली आहे.तेव्हा पासून या गावात दरवर्षी पौष पौर्णिमेला गौमातेची यात्रा व मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो, गाईवर मोठी श्रद्धा असल्याने प्रत्येक घरात गाईला बसण्यासाठी व झोपण्यासाठी गादीची व्यवस्था असून स्वयंपाक घरापर्यंत नेऊन गाईला निवेद्धही दिला जातो,काल मृत्यू पावलेल्या गाईसह आतापर्यंत सहा गाईचा मृत्यू झाला असून सर्व देवरुपी गाईला मंदिराच्या पायथ्याशी समाधी देण्यात आली हे विशेष..
------------------------------------------
