बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
राज्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वडिलांमुळे बुलढाणा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांनीही शिंदे गटात प्रवेश घेतला त्यामुळे त्यांच्यासोबत घाटाखालील जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी सुद्धा बंड करीत शिंदे गटात प्रवेश घेतला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी खासदार प्रतापराव जाधव व जिल्हा प्रमुख पदावरून शांताराम दाणे यांची हकालपट्टी केल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ पदाधिकारी वसंतराव भोजने यांची जिल्हाप्रमुख पदी नव्याने नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे, जळगाव जामोद तालुकाप्रमुख गजानन वाघ, माजी नगरसेवक रमेश ताडे, अल्पसंख्यांक सेनेचे चांद कुरेशी, युवा सेनेचे शुभम पाटील, ईश्वर वाघ, संजय भुजबळ, विजय काळे, विशाल पाटील, पवन वाघ,संकेत रहाटे, मुश्ताक भाईजान उपतालुकप्रमुख जळगांव जामोद ,मंगेश कतोरे युवासेना उपशहर प्रमुख, नदीमबाप्पू देशमुख, मेहमूदभाई जमदार यांच्यासह जळगाव जामोद तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नांदुरा येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करीत नवनियुक्त जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांचा सत्कार करण्यात आला.
