मागील एक आठवड्यापासून अचलपूर तालुक्यातील सापण नंदी पत्रातून येणारी मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन वाहून गेल्याने अचलपूर पारतवाडा या जुळ्या शहरातील नागरिकांना मधे पाण्याकरिता हाहाकार निर्माण झाला आहे . पाणीपुरवठा खंडित झाला मुळे परतवाडा जुळ्या शहरातील नागरिकांना मानसिक व त्रास सहन करावा लागत आहे. हि बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी या समस्या कडे लक्ष देऊन त्यांनी प्रशाशक एस, डी,, ओ,अपार व मुख्याधिकारी यांना निर्देश दिले. युद्धस्तरावर पाईप लाईन चे काम करून जने करून जनतेला लवकर पाणी मिळेल असे निर्देश दिले. मागिल दिवशी हिच पाईप लाईन दुरुस्त केली होती परंतु मागील दोन, तीन दिवसापासून सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे सापन नंदी मध्ये असलेली तीच पाईप लाईन पुन्हा वाहून गेल्याने जुळ्या शहराला राजकीय व सामाजिक संघटनेचे माजी नगर सेवकांनी पुढाकार घेऊन खाजगी टँकर द्वारे जनतेला पानी पुरवठा दिला अखेर अपार साहेब यांनी तांत्रिक बाब जाणून घेऊन सदर पाईप लाईन दुरुस्ती चि जबाबदारी माजीप्र कडे सोपविली. जलवाहिनी चे काम लवकरच पूर्ण होण्याची संभावना असुन येणाऱ्या काही दिवसातच पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे समजले जात आहे.
नागरिकांना काही दिवसातच पिण्याचा पाणी मिळण्याची शक्यता..पाईप लाईन दुरुस्ती माजीप्र कडे...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
