महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या व नुकताच जाहिर झालेल्या NMMS परीक्षेच्या निकालात आदिवासी बहुल भागात असणाऱ्या जनता विद्यालय जामोद येथील 32 विद्यार्थांपैकी 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अत्यंत खडतर व प्रतिष्ठेच्या समजणाऱ्या जाणाऱ्या या परिक्षेत दरवर्षीप्रमाणे विद्यार्थानी मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे. अनेक विद्यार्थानी अत्यंत खडतर व विपरीत परिस्थितीवर मात करीत गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही हे सिद्ध केले असे मनोगत जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिलजी जयस्वाल यांनी व्यक्त केले, तर ग्रामीण भागात अत्यंत दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून जनता विद्यालयाने विद्यार्थ्यांना फक्त शालेय अभ्यासक्रमात गुरफुटून न ठेवता स्पर्धा परीक्षेत सुद्धा ते पुढे राहतील ह्याचे सातत्याने नियोजन केले आहे असे मनोगत संस्थचे सचिव अनुपजी पुराणिक यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिलजी जयस्वाल व संस्थेचे सचिव अनुपजी पुराणिक यांनी जनता विद्यालयात येऊन यशवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान व गौरव केला व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. सर्व गुणवंत विद्यार्थानी आपल्या यशाचे श्रेय जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिलजी जयस्वाल, सचिव अनुपजी पुराणिक व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनात कार्यरत असणारे शाळेचे मुख्याध्यापक हागे सर, पर्यवेक्षक राजपूत सर, परीक्षा प्रभारी घुगे सर, या परीक्षेत विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करणारे धर्मे सर व सर्व शिक्षक यांना देत आहे. आमचे विद्यालय यापुढे सुद्धा असेच गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध आहे अशी मनीषा विद्यालयाचे मुख्यध्यापक हागे सर व पर्यवेक्षक राजपूत सर यांनी यावेळी व्यक्त केली.
जनता विद्यालय जामोद येथील 16 विद्यार्थी NMMS परीक्षेत उत्तीर्ण...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
