दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी पंचायत समिती सभागृह जळगाव जामोद येथे महा आवास अभियान 2.0 सन 2021-22 अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेमध्ये प्रत्येकी तीन ग्रामपंचायती आणि केंद्र व राज्य पुरस्कार योजनेत उत्कृष्ट घरकुल बांधकाम करणाऱ्या प्रत्येकी तीन लाभार्थीचा सन्मान जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर श्री संजयजी कुटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जामोद च्या उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर उपस्थित होत्या.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भाग्यश्री विसपुते मॅडम आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक माननीय राजेश जी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, पंचायत समिती जळगाव जामोद च्या वतीने सदर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाद्वारे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्री शिवशंकर भारसाकळे यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरीसाठी ग्रामपंचायत पळशी सुपो चे सरपंच व सचिव यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला,तर अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी ग्रामपंचायत भिंगारा व जामोद यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत योजनेमध्ये तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरीसाठी ग्रामपंचायत काजेगाव यांना प्रथम पुरस्कार माननीय आमदार डॉक्टर संजय जी कुटे यांच्या हस्ते देण्यात आला तर अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी ग्रामपंचायत खेरडा खुर्द व गाडेगाव बुद्रुक च्या सरपंच व सचिव यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुक्यातून उत्कृष्ट घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांचा ही सन्मान माननीय आमदार महोदय आणि उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तालुक्यातून उत्कृष्ट घरकुलाचा प्रथम पुरस्कार खेरडा बुद्रुकचे लाभार्थी श्री दिगंबर बोंबटकर, द्वितीय पुरस्कार चावरा येथील भिका रामभाऊ लादे तर तृतीय पुरस्कार उमापूर येथील फेरांच्या हाजासिंह चोंगळ यांना प्रदान करण्यात आला. तसेच राज्य पुरस्कृत योजनेमधून तालुक्यातून उत्कृष्ट घरकुलाचा प्रथम पुरस्कार आसलगाव येथील प्रमोद मनोहर घोडे, द्वितीय पुरस्कार वडशिंगी येथील नामदेव दिपाजी भगत तर तृतीय पुरस्कार जामोद येथील प्रमोद शहादेव भगत यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बेघर गरजू घरकुल लाभार्थ्यांना शक्ती प्रदत्त समितीच्या माध्यमातून 800 लाभार्थ्यांना सरकारी जागेवरील अतिक्रमण नियमनाकूल करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांचा देखील आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शक्ती प्रदत्त समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असून त्यांच्याकडे पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी श्री मोरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ही अतिक्रमण नियमानुकूलची प्रकरने गेल्या तीन वर्षात सादर केलेले होते. पंचायत समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर मॅडम यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान यावेळी त्या सर्व लाभार्थ्यांच्या वतीने देण्याची विनंती करण्यात आली होती ज्यांना हक्काची जागा मिळाल्याने घरकुलाचे स्वप्न साकार झाले.नमूद करण्यात येते की, पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत आतापर्यंत 184 लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बुलढाणा च्या वतीने देण्यात आले आहे.यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री फाळके यांनादेखील N.M.M.S परीक्षेतील पंचायत समितीमधून 106 विद्यार्थ्यांना घवघवीत यशासाठी माननीय आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या 106 विद्यार्थ्यांपैकी किमान 75 पेक्षा जास्त विद्यार्थी चार वर्षासाठी शिष्यवृत्तीस पात्र ठरण्याची अपेक्षा आहे. तालुक्यातील शिक्षक वृंदांनी या परीक्षेच्या तयारीसाठी दर शनिवारी दिवसभर विकेंद्रीत स्वरूपात अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांची तयारी केली होती.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांनी घरकुल योजनेत चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांचे अभिनंदन केले तसेच तालुक्यातून अजूनही अनेक गरजू लाभार्थ्यांपर्यंत घरकुल योजनेचे लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः नस्ती हाताळून त्वरेने कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व सचिव आणि अधिकाऱ्यांना दिले. ज्या लाभार्थ्यांचा समावेश लाभार्थी यादीत विविध कारणाने झालेला नाही त्यांच्या समावेशासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले सरते शेवटी यशस्वीतांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार मानून सन्मान सोहळ्याचे सांगता करण्यात आली.
पंचायत समिती जळगाव जामोद मध्ये महाआवास अभियान 2.0 अंतर्गत लाभार्थीचा सन्मान सोहळा संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
