शालेय पोषण आहाराची चौकशी झालीच नाही.मनसेचे जळगांव जा.तालुका अध्यक्ष राजु राऊत, शहर अध्यक्ष नागेश भटकर यांनी केले आरोप...


 जळगांव जामोद प्रतिनिधी..  

जळगांव जामोद तालुक्यातील सर्व शासकिय निमशासकिय शाळेच्या १ ली, ते ५ वी प्रती विदयार्थी तादुळ १९ ५५० ग्रॅम,  मुंगदाळ ४ किलो ५०० ग्रॅम वटाणा ५किलो ७०० ग्रॅम तसेच ६ वी ८ वी प्रती विदयार्थी तांदुळ २९ किलो ५५० ग्रॅम, मुंगदाळ ७ किलो वटाणा ८ किलो २५० ग्रॅम  हे सर्व धान्य वजन काटयाने मोजमाप  करुनच   धान्य वाटप करावे असा शासनाचा आदेश असल्यावरही तालुक्यामधील कोणत्याच शाळेत नियमानुसार वाटप झाला नाही. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका व शहराच्या वतीने तक्रार केली होती पण कुठल्याच प्रकारची अमलबजावणी किंवा कोणत्याच अधिकाऱ्यावर  कठोर कार्यवाही करण्यात आली नाही. त्यासाठी आज दि. १३/८/२०२२ रोजी उपोषण सुरु झाले उपोष तालुका अध्यक्ष राजूभाऊ राउत ,शहर अध्यक्ष नागेश भाऊ भटकर, शाखा अध्यक्ष योगेश म्हसाळ हे उपोषण करत आहे.

Previous Post Next Post