गेल्या काही दिवसापासून एकसारखं पाऊस असल्याने धारणी शहरातील सर्व पाणी म्हाडा कॉलोनीमध्ये वाहुंन्येत आहे.या परिसरात नाल्या व रस्ते नसल्याने म्हाडा कॉलोनी मध्ये सर्व पाणी व घाण जमा झाली आहे.या परिसराला तळ्याचे स्वरूप आल्याने नागरिकांच्या घरात पाणी जात आहे त्यामुळे सरपटणारे प्राणी आणि जीवजंतू ची नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने डासांचा प्रार्दुभाव झाला आहे. साथीच्या आजारांनी लागण होत आहे.म्हाडा कॉलनी तील रस्ते व गटार बांधण्यासाठी नगरपंचायत तसेच उपविभागीय अधिकारी ,जिल्हाधिकारी कार्यालयात 35 वेळा पत्रव्यवहार व एकवेळ उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करूनही ही समस्या नगरपंचायत प्रशासनाने निकाली काढली नसल्याने येणाऱ्या स्वतंत्र दिनी 15 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याबाबत माहिती म्हाडावासियानी दिली आहे.
________________________
उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दरम्यान न. प.ने जून पर्यंत रस्ते व नाल्याचे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. तरी अद्याप काहीच कार्यवाही नाही.
ज्ञानदेव येवले: नागरिक म्हाडा
________________________
________________________
रस्ते व नाल्या नसल्याने सर्वत्र पाणीच पाणी व चिखल झाल्याने किचड तुडवत जावे लागते. व घरात साप विंचू येत असल्याने भीती निर्माण झाली आहे.त्याकरिता आंदोलन शिवाय पर्याय नाहि.
विजेंद्र सरागे . म्हाडा नागरिक
