पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे संत नरहरी सोनार महाराज यांची जयंती संपन्न..


 मंगल काकडे/जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी.

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त पिंपळगाव काळे सुवर्णकार समाज बांधवांनी पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे उपस्थित मान्यवरांच्या ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रीतीताई गोपाल तायडे तसेच उपसरपंच सौ.भारतीताई महेंद्र बांगर. व ग्रामपंचायत सदस्य.सदस्या यांच्या हस्ते संत नरहरी महाराज. संत गाडगे महाराज. संत तुकडोजी महाराज. त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व पूजन करून अभिवादन करण्यात आले.तसेच सुवर्णकार समाज बांधवांनी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून समाज बांधवांकडून अभिवादन करण्यात आले.संत नरहरी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज या तिन्ही प्रतिमेचे पूजन सुवर्णकार समाज बांधवांकडून करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.व गावामध्ये स्वच्छता मोहीम ग्रामपंचायत सरपंच.उपसरपंच. सदस्य.सदस्या. या सर्वांकडून गाव स्वच्छ मोहीम पिंपळगाव काळे येथे राबविण्यात आली. व ग्रामपंचायत सांस्कृतिक भावनांमध्ये महिला मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यामध्ये मोलाचे मार्गदर्शन केले की घर घर तिरंगा आपल्या घरावर कसा लावायचा व तो कसा फटकायचा असे मार्गदर्शन आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन सांगावे असे मार्गदर्शन ग्रामपंचायत सचिव ढगे साहेब यांनी केले.यावेळी उपस्थित. सरपंच सौ. प्रीतीताई तायडे.उपसरपंच सौ भारतीताई बांगर. प्रशांत सोनार. गजानन सोनार. सुनील सोनार. राम सोनार. ग्रामपंचायत सदस्य. उषा चोखंडे. वंदना निकम. दुर्गा मांडोकार. विनोद बहादरे. शेख हारून अत्तार .नवल गोतरकार. गोपाल तायडे. बालू निकम. उमेश मांडोकार. ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील मंडळीची उपस्थिती होती.

Previous Post Next Post