खामगाव ता.प्रतिनिधी...
खामगाव येथील बोबडे कॉलनी मधील शिवभक्तांनी श्रावण महिन्याचे अवचित साधून बोबडे कॉलनी येथील गणेश मंदिराच्या बाजूला शिव पिंडीची विधीवत पूजा करून स्थापना केली.स्थापनेच्या आधी सर्वप्रथम आराध्य दैवत श्री गणेश मूर्तीची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात केली. पुजेमध्ये नाना टिकार- विजयाताई, निळकंठ लांजूळकर-मंदाताई,राजेश जोशी- सुवर्णाताई,सूर्यकांत काळे- आशाताई,अवि भाऊ व पूजा ताई.ह्या पाच जोडप्यांनी देवी देवतांचे फोटो समोर पूजा मांडून पूजा केली व त्यानंतर भक्तिमय वातावरणात कॉलनीतील असंख्य शिवभक्तांच्या उपस्थिती होम हवन करून, पिंडीचे दही दूध पंचमृताने स्नान केले. बेलपत्र चढऊन शिवपिंडीची स्थापना करून पूजा व आरती केली. यावेळी कॉलनीतील सर्व मंडळीनी भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला.
