संयुक्त राष्ट्रसंघतर्फे 9 अगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून विश्वभर साजरा केला जातो.आदिवासी संस्कृती आणी त्यांचा अस्मितेचे ओळख जगाला व्हावी आणी एकजुटीचे प्रदर्शन व्हावे म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि 9 अगस्ट चे औचित्य साधुन चिखलदरा तालुक्यात हि विविध आदिवासी समाजाच्या संघटना तर्फे आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. दहेंद्री ग्रामपंचायत येथील कोटमी गावात भगवान बिरसा मुंडा ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,रेंगा कोरकू,टंट्या भील ,आदि.आदिवासी क्रांतिकारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून हरार्पण करून अभिवादन करण्यात आले.जय सेवा जय आदिवासी, जल जंगल जमीन , चा जयघोष करून हजारों च्या संख्यने आदिवासी बांधवानी भव्य रैली काढून आदिवासी संस्कृतिचे दर्शन घड़वीले . या रैलीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घड़वनारे पेहराव परिधान करून आदिवासी बांधव सहभागी झाले होते.या रैलीत सुशिक्षित तरुण तरुणीचा मोठा सहभाग दिसून आला. रैली ची सुरुवात कोटमी पासून ,दहेंद्री,पलस्या ,चुरणी, कारदा,कालापांढरी,आवागड़ जारीदा,बिबा ,राहु,हतरू , मग गांगरखेड़ा,काटकुम्भ ,कोयलारी,डोमा ,बामादेही,काजलडोह तर सर्वच गावात हि भव्य रैली निघाली. या रैली मध्ये आदिवासी संस्कृती ,आदिवासी नृत्य,आदिवासी गीते, गदली नृत्य, गोंडी नृत्य , विविध वाद्य, वेशभूषा ,पारंपारिक लोकनृत्याचा माध्यमातून आदिवासी कलागुण पहायला मिळाले.तसेच आदिवासी क्रांतिकाराचे देखावे सादर करण्यात आले .युनो ने 9 अगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस जाहिर केला असून त्यानुसार हा दिवस उत्साहाने आदिवासी बांधवा कडून मेलघाटात पण साजरा केला जात आहे .
चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथून आदिवासी दिनानिम्मित्त निघाली भव्य रैली...घड़वीले आदिवासी संस्कृतिचे दर्शन...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
