राखी हा सण बहिन भावाचा पवित्र नात्याचा दिवस म्हणून संपूर्ण भारत देशात साजरा केल्या जाते या दिवशी बहिन आपल्या भावाला राखी बाधून त्याचा कडून आपल्या रक्षणाची जणू भेट मागत असते.या पवित्र नात्यामधे अशी ताकत आहे की ज्यामुळे तिला आपल्या पाठीराख्या भावाचा नित्य अभिमान असतो .अशा या दिवशी कोटमी शाळेतील विद्यार्थिनी यांनी आपल्या शाळेतील मुलाना राखी बांधून शाळेत रक्षाबंधन हा सन उत्साहने साजरा केला. लहान लहान चिमुकल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे,गोडव्याचे स्मित हास्य फुलवते आणि त्या मुलाना सुद्धा आपल्या हक्कची नाती जपनारी बहिन आहे यांचा आनंद वाटतो.राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते.राखी अर्थात हा साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत.भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. राखी हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो.भावाबहिणीचे स्नेह,प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे.भावाबहिणीचे नाते हे भांडणाचे, खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे.या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक निंभेकर सर ,देशमुख सर ,विपीन राठोड़ सर,राखी कडु मॅडम, चर्जन मॅडम,सामाजिक कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य रवी भाऊ बेठेकर व कोटमी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा कोटमी येथे रक्षाबंधन उत्सव साजरा...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी....
