वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अकोला च्या स्थायी समिती सभेमध्ये हिवरखेड ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी स्थानिक चंडिका माता चौक येथे वंचित बहुजन आघाडी हिवरखेड व गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. वंचित बहुजन आघाडी जिल्हा अकोला यांचे योग्य मार्गदर्शन या निर्णया साठी निर्णायक ठरले. त्या साठी वंचित बहुजन आघाडी चे सर्व अकोला जिल्हा चे पदाधिकारी यांचे आभार.यावेळी मधुकरजी पोके .प्रकाशजी खोब्रागडे, शांताराम जी कवळकार, सूनीलजी इंगळे,डॉ.प्रशांत इंगळे, मनोहरजी ताडे, विनोदजी भोपळे, शेख आदिल, नरेशजी बांगर, मोईस जमादार, पुरुषोत्तमजी राजनकार, प्रशांत ढोकणे,,रियाझउद्दिन बहुद्दीन व आदरणिय पत्रकार मंडळीतसेच गावकरी उपस्थित होते. या वेळी पत्रकार बंधूचे आभार मानले.
हिवरखेड नगरपंचायत होण्याची घोषणा ऐकताच वंचित बहुजन आघाडीने केला जल्लोष...
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी..
.jpg)