धारणी शहराच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावरील एका शासकीय जागेवर में.रसिक मेलघाट नावाने खासगी व्यक्तीने चक्क भारत पेट्रोलपंप सुरू केले आहे. ३ कोटी रुपये शासकीय मूल्य असलेल्या या अतक्रिमीत जागेवर सुमारे लाखो रुपयांचा खासगी व्यवसाय केल्या जात असताना आता याच शासकीय मलाईदार भूखंडाला ३० वर्षांसाठी लिजवर देण्याचा डाव महसूल विभागामार्फत रचल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोबतच यापूर्वी पेट्रोलपंपमालकाने लाखो रुपये महसूल बुडवल्यिाप्रकरणी धारणीचे तत्कालीन एसडीओ डॉ. विजय राठोड यांनी २२ लाख रुपये दंड केला होता. परंतु यातील केवळ ११ लाख रुपयांचीच रक्कम जमा करीत उर्वरित ११ लाख रुपये आजपर्यंत भरल्याचे उजेडात आले आहे.धारणी शहराच्या नगरपंचायत क्षेत्रातील नजुल शिट क्र.५, प्लॉट क्र.३४६, सर्वे नं. ९३ एफ ही मलाईदार ६ हजार स्क्वेअर फूट जागेची धारणी बाजार किंमत ३ कोटीच्या घरात आहे. सदर शासकीय जागेवर में. रसिक मेलघाट भारत पेट्रोलपंप मालकाने ६० वर्षांपासून अतक्रिमण केले आहे. तेथे पेट्रोलपंप लावले असून कोट्यवधीचा व्यवसाय या जागेतून केल्या जात आहे. परंतु चार वर्षांपूर्वी या जागेवर तत्कालिन एसडीओंनी आक्षेप घेतला होता. सदर जागा लिजवर नसून त्यासंदर्भातील कोणत्याच प्रकारचे कागदपत्रे पंपमालक व तहसील कार्यालयात उपलब्ध नसल्याचा अहवाल धारणीचे तत्कालीन एसडीओ डॉ.विजय राठोड यांनी सादर केला होता. या प्रकरणी अतक्रिमीत पेट्रोलपंपची कसून चौकशी करण्यात आली.पंपमालकाने लाखो रुपयांचा महसूल कर बुडवल्यिाचे लक्षात येताच त्यांनी शासकीय अटी, शर्ती नियमानुसार ७ मार्च २०१८ रोजी २२ लाख ४० हजार रुपये दंड ठोठाविला होता. मात्र पंपमालकाने त्यावेळी काही महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून फक्त ११ लाख रुपये दंड भरला व उर्वरित ११ लाखांचा दंड ४ वर्षे लोटल्यानंतरही भरला नाही. याउलट ही शासकीय जमीन चक्क ३० वर्षांसाठी लिजवर घेण्याचा घाट रचल्या जात आहे. याची प्रक्रियादेखील सुरू केल्याची माहिती आहे. शासन नर्णियानुसार कोणत्याही शासकीय जागेवर खाजगी व्यवसाय करण्याकरिता लिजवर देण्याचा नियम नाही. लिजसाठी शासकीय, निमशासकीय, संस्थांना सामाजिक उपक्रमाकरिता देण्याचा नियम आहे. मात्र या सर्व नियमांचे उल्लंघन करीत कोट्यवधींची जागा खाजगी व्यक्तीस व्यवसायाकरिता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
धारणीत 3 कोटींच्या शासकीय जागेवर खासगी पेट्रोलपंप ला 30 वर्षा साठी लीज वर देण्याचा महसूल अधिकाऱ्याचा घाट..यापूर्वी पेट्रोलपंप मालकावर २२ लाखांचा दंड,,,भरले मात्र 11 लाख...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
