डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सादर केले पथनाट्य...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही टी भारसाकळे हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्ग 8 च्या विद्यार्थ्यांनी 'मेरा शहर साफ हो ' या विषयावर पथनाट्य सादर केले तर वर्ग दहा अ च्या विद्यार्थिनींनी 'भारत देश कैसा हो' या विषयावर पथनाट्य सादर केले सदर पथनाट्यांमध्ये स्वच्छतेवर भ्रष्टाचार मुक्त भारत याविषयी उद्बोधन करण्यात आले .सदर पथनाट्यांमध्ये कु कोमल राजपूत, भारती सुलताने ,कु प्रणाली , कु श्रद्धा ,कु जानवी ,नेहा , कु जागृती ,कु रुचिता ,कु अदिती, मनप्रीत सिंग वेदांत ,सुपेश ,केशव तर वर्ग दहावी तर्फे वैष्णवी म्हसाळ, तेजस्विनी, प्रतीक्षा ,समीक्षा, वेदिका, तन्वी ,गायत्री, आचल ,प्रांजली, गायत्री मोरखडे व नेहा इत्यादी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी करिता के आर पवार, एम बी पवार व केओ  इंगळे  यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले.

Previous Post Next Post