महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध आगळे वेगळे उपक्रम विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी राबविले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात दिनांक नऊ ऑगस्ट पासून सामूहिक राष्ट्रगीत गायनाने झाली. तसेच दिनांक 10 ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहीम देशभक्तीपर गीत स्पर्धा वृक्ष लागवड हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे जनजागृती फेरीमध्ये संस्थेचे सचिव अविनाश उमरकर यांनी सहभाग घेऊन मुलांचा उत्साह वाढविला.. दिनांक 11 ऑगस्ट रोजी वृक्षांना राखी बांधणे व वृक्ष संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला. दिनांक 12 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 13 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा व झेंडावंदन कार्यक्रम घेण्यात आला. दिनांक 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन व प्रभात फेरी वेशभूषा तसेच विविध घोषणांच्या गजराने निघाली. दिनांक 16 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर नाटिका व नृत्य या सहदिनांक 17 ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण कार्यक्रम तसेच सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न झाले. शाळेचे मुख्याध्यापक पी एस गायकी यांनी दिनांक 13 14 आणि 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम संपन्न केला.

Previous Post Next Post