बापुमीया सिराजोद्दीन पटेल शैक्षणिक संकुल पिंपळगाव काळे येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण संपन्न...

जळगांव जा.प्रतिनिधी:-

पिंपळगाव काळे येथील बापूमिया   सिराजोद्दीन पटेल शैक्षणिक संकुल येथे दिनांक 15 ऑगस्ट  रोजी सकाळी ठीक 7.30 वा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आय. ए. राजा सर होते;तर ध्वजा रोहणासाठी प्रमुख अतिथी गौलखेड येथील सदन कास्तकार  मुरलीधर पाटील यांची उपस्थिती होती,तसेच प्राचार्य मुकुंद इंगळे, मुख्याध्यापक अजित तडवी  यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर बापुमीया सिराजोद्दीन पटेल शैक्षणिक संकुल येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान चित्रकला ,निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या सर्व स्पर्धे मध्ये विजयी स्पर्धकांना पंचायत समिती ,जळगाव जामोद यांचे कडून प्राप्त प्रमापत्राचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.चित्रकला स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक कु.वैष्णवी बावस्कर, व्दितीय क्रमांक कु.कल्याणी अंबुस्कर ,तर तृतीय क्रमांक कु. वैष्णवी जामोदे  या विद्यार्थिनी नी मिळवला.तसेच निबंध स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक कु. मेघा भोपळे , व्दितीय क्रमांक कु.कोमल बावस्कर ,तृतीय क्रमांक कु. साक्षी गई यांनी पटकाविला.त्यानंतर प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देवून संस्था अध्यक्ष एँड.सलिमजी पटेल यांच्या अथक परिश्रमातून सन 2022-2023 पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करून दिली ,तसेच प्राचार्य डॉ. आय. ए.राजा, मुरलीधर पाटील यांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमा साठी सर्व  प्राध्यापक व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

Previous Post Next Post