शिवसंग्राम चे अध्यक्ष स्व. विनायकराव मेटे यांना जळगाव जामोद येथे भूमिपुत्रांच्या वतीने वाहिली श्रद्धांजली...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी झटणारे संपुर्ण आयुष्य समाजसेवेला अर्पण  करणारे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांना भूमिपुत्रांच्या वतीने जळगाव जामोद येथे श्रद्धांजली चा कार्यक्रम दिनांक 16 ऑगस्ट रोजी आयोजित केला होता.यावेळी मेटे साहेब यांना अक्षय पाटील, तुकारामजी गटमने, वैभव जाणे, अश्पाक देशमुख, अजय गिरी, नागेश भटकर, विष्णू पाटील, शिवाजी मेहसरे, सोपान पाटील, गणेश परिवार, अवी पाटील, गजानन व्यवहारे , गोपाल ढगे व इतर उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली

Previous Post Next Post