उद्यापासून दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून यावेळी घराघरांमध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. गणेशोत्सवामध्ये पुरुष महिला लहान मुले,मुली, वृद्ध व्यक्ती हे आवर्जून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आरती व इतर कार्यक्रमाकरिता येत असतात त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहणे अत्यंत गरजेचे आहे परंतु काही दारू विक्रेते उत्सवाचा गैरफायदा घेऊन अवैध दारू विक्री करीत असतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. काही संकुचित मानसिकतेचे लोक दारू पिऊन व अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी सह नको ते कार्य करतात त्यामुळे सण उत्सवाचे पवित्र धोक्यात येऊ शकते त्यामुळे सण उत्सवाचे पावित्र्य कायम राहील आणि यामुळे व्यसनाला सुद्धा आळा बसेल करिता उत्सव काळामध्ये दारूबंदी करण्यात यावी यासह कोणत्याही प्रकारची विद्युत कपात अथवा सार्वजनिक विद्युत पुरवठा वीज वितरण विभागाने खंडित न करता सुरळीत चालू ठेवावा या मागणीसाठी दिनांक 30 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहर शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यासह वीज वितरण केंद्र जळगाव जामोद येथे सदर निवेदन दिले निवेदन देतेवेळी उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, जळगाव जामोद तालुका प्रमुख गजानन वाघ, शहर प्रमुख प्रमुख रमेश ताडे, उप तालुका प्रमुख मुस्ताक भाईजान, वाहतूक सेना तालुकाप्रमुख गणेश धुळे, कैलास राजपूत माजी शहरप्रमुख, वाहतूक सेना उपतालुकाप्रमुख विजय पूरी,किसानसेनेचे बाबा टावरी, युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक ईश्वर वाघ,विशाल पाटील, गोपाल ढगे,योगेश पांधी,मंगेश कतोरे, पवन अवचार, रामकृष्ण वंडाळे,रमेश हागे, सुभाष माने,पंडित माटे,युवराज देशमुख,यांच्यासह बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
गणेशोत्सवा दरम्यान दारूबंदी करण्यात यावी तसेच विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने दिले निवेदन...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
