जिल्हा परिषद शाळा दहेंद्रिढाना येथे चक्क पलकांनी शाळेला ठोकले कुलुप...मेलघाटची शिक्षण व्यवस्था सलाइनवर, १ ते ५ वर्ग मात्र शिक्षक 1...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत दहेंद्रिढाणा या जि. प. शाळेला वर्ग १ ते ५ वर्ग असून ७१ एवढे पटसंख्या आहे. आणि नियमाने इथे किमान 3 शिक्षक असणे गरजेचे आहे. परंतु वेळोवेळी गटविकास अधिकारी चिखलदरा व मुख्यकार्यपालन अधिकारी अमरावती यांना शिक्षक मागणी पत्र दहेंद्रि येथील सरपंच संजू साकोम यांनी  दिले. परंतु त्यावर ही तात्पुरती शिक्षक व्यवस्था चुर्नी केंद्र मधुन एक शिक्षिका दहेंद्रि जि. प. शाळेला देण्यात आले. परंतु पालक यांचे म्हणने आहे की आमच्या गावातील शाळेला नियमित स्वरूपाचा शिक्षक हवा आहे. कारण असे की, आमच्या मुलांचा शिक्षणावर खंड पडतआहे पहिलेच आमच्या मुलांनी दोन वर्ष हे कोविड मुळे चिंतेत  गेले अजून तिच संताप चिंता शिक्षका विना निघून जाईल याचा भ्रुदन्ड आमच्या मुलांच्या भविष्यात येईल. म्हणून प्रशासनाने यावर लवकरात लवकर शिक्षक नेमून पाठवावे.असे पालकांचे म्हणने आहे. आधीच मेळघाटातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता आहे आणी त्यामधेही  सहाय्यक शिक्षकांना केंद्रप्रमुखाचा प्रभार देऊन आदिवासी विध्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र दिसून येत आहे .केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारांचा शाळा भेटीला पूर्णता दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप केला जात आहे .त्यामुळे मेळघाटची शिक्षण व्यवस्था सलाईन वर असून आदिवासी विध्यार्थांचा शिक्षणाचा  तीन तेरा वाजवले समजले जाते .म्हणून प्रशासनाने मेळघाटातील सर्वच जिल्हा परिषद शाळेचा समस्या व दहेंद्री ढाणा येथील शाळेवर लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढून नियमित शिक्षक नेमण्याची मागणी उपस्थित पालकांनी व गावकर्यांनी केली आहे. अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असा इशारा पालकांनी दिला आहे.

Previous Post Next Post