सर्वात जुनी असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था रजि नं. ६०६ मर्यादित जळगांव जामोद ह्या संस्थेची निवडणूक माजी मंत्री आ.डॉ संजय कुटे ह्यांच्या मार्गदर्शनात अविरोध होणार आहे ह्या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक कार्यक्रम हा अर्ज भरणे दिनांक १८/८/२०२२ ते दिनांक २४/८/२०२२ पर्यन्त दुपारी ३:०० पावेता होता. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी ह्यांच्या कार्यालयात निर्धारित वेळेत फक्त १३ तेरा च नामनिर्देशन पत्र दाखल आणि निवडणूक ही १३ च संचालकाची होती ह्या मध्ये अ) सर्व साधारण खातेदार कर्जदार मतदार संघात ८ आठ संचालक आवश्यक होते त्यामध्ये १) मो. अयुब मं. करिम (बाबु जमदार) २) अनिल कृष्णराव अंबडकार ३) कैलास अजाबराव देशमुख ४) समाधान सुर्यभान म्हसाळ ५) अरुण लक्ष्मण वंडाळे ६) अशोक भाऊराव नानकदे ७) सुभाष रामभाऊ बंबटकर ८) अभिमन्यू मोतीराम भगत. ब)) अनुसूचित जाती मतदार संघ एक संचालक ९) नरेंद्र रामभाऊ माटे .क)) महिला राखीव मतदारसंघ - दोन संचालक १०) शांताबाई विठ्ठल केदार ११) तानाबाई शंकर तांडे . ड)) इतर मागास प्रवर्ग - एक संचालक १२) अरुण तुकाराम खिरोडकार . इ)) भटक्या विमुक्त जाती - जमाती ह्या मतदार संघात एक संचालक १३) प्रल्हाद बुलाजी बोंद्रे ह्याचेच नामनिर्देशन पत्र निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले होते इतर कोणोचे नामनिर्देशन पत्र निर्धारित वेळेपर्यंत व नंतर प्राप्त न झाल्याने वरील १३ तेरा ही संचालक अविरोध होणार आहेत निवडणूक यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष रामदास बंबटकर , माजी नगरसेवक कैलास डोंबे व निलेश शर्मा ह्यांच्या परिश्रमाने कमी आले तर शंकर तांडे , रामा इंगळे , नारायण पाटील , कैलास पाटील, गजानन डोंबे ह्यांच्या सहकार्य होते निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यु.डी.धर्माळ हे होते तर निवडणूक कार्यालयात वि. कार्य. सोसायटी कर्मचारी विजय भड , शंकर धुर्डे ह्यावेळी हजर होते. वरील तेरा ही संचालकांना माजी मंत्री आ. संजय कुटे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
आ.डॉ.संजय कुटे च्या मार्गदर्शनात वि.कार्य.सह. संस्थेची निवडणूक अविरोध होणार !
जळगांव जा प्रतिनिधी...
