जळगावात बैल पोळा उत्साहात साजरा.. पोळ्यामध्ये पूजेचा मान देशमुख कुटुंबाला...


जळगाव जा.प्रतिनिधी:-अशोक टाकळकर...

जळगाव जामोद शहरातील वायलीवेस येथे मोठ्या उत्साहात बैलपोळा संपन्न झाला. याठिकाणी सर्वप्रथम बैलांची पुजा करण्यात आली. तसेच याठिकाणी शेतकऱ्यांनसह स्थानिक नागरिकांनी महादेवाची आरती, पोहाळे म्हणून बैलपोळा फुटला असे जाहीर करण्यात आले. सदर नंदी पुजनाचा मान जळगांव जामोद येथील निलेश देशमुख यांना मिळाला. त्यांनी विधिवत नंदी बैलांची पूजा केली. पोळा हा सण वर्षभर राबराब राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. त्यानिमित्त सर्जा राजाला सकाळी शेतकरी राजा अंघोळ घालून सजवायला सुरुवात करून बैलाला सजवण्यासाठी गोंडे घंटा रंग फुलांचे हार शिंगाना लावण्या करिता हिरवा पिवळा,लाल,केशरी,निळा रंग लावला जातो अंगावर लाल गुलाबी हिरव्या रंगाचे ठिपके व पाठीवर झूल टाकण्यात येते व संध्याकाळी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोळा बंदोबस्ताकरिता जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे, अमोल वनारे, निलेश पुंडे, सचिन राजपूत, योगेश निंबोळकर, प्रेमसिंग पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Previous Post Next Post