बुलडाणा जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामानां देणार भरीव निधी:-नितीन गडकरी याचे आश्वासन..भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या अथक प्रयत्नांना येणार यश..


 बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी:-

भारतमाला योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या महामार्गातील  जालना नागपूर आणि मुंबई नागपूर या महामार्गाचे तीनपदरीकरण करण्यात यावे. आणि या महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी केंद्रीय परिवहन नितीन गडकरी याच्याकडे केद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी केली.दिल्ली येथील परिवहन भवन येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवुन खा प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या दृष्टिकोनातून विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये मलकापूर= सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे  मुंबई कोलकत्ता  राष्ट्रीय महामार्ग 6 हा बुलडाणा जिल्ह्यातून जात असून  मलकापूर येथील चिखली रणथम ते खामगाव बाळापुर हद्दीपर्यंतच काम हे अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामांना गती देण्यात यावी आणि या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम त्वरीत पूर्ण करावीत अशी मागणी खासदार प्रतापतराव  जाधव यांनी यावेळी केली. शिवाय आदिवासी बहुल भाग असलेल्या संग्रामपूर जळगाव जामोद ते बुलढाणा मुख्यालय जोडणाऱ्या नांदुरा रेल्वे गेट वर उड्डाणपूलच काम त्वरित सुरू करावं कारण या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रेल्वेची वाहतूक सुरू असते त्यामुळे वाहनधारकांना ताटकळत बसावं लागतं ही समस्या निकाली काढण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. या रेल्वे पुलाचे काम त्वरित सुरू करून लोकांची  गैरसोय टाळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. चिखली मेहकर या राष्ट्रीय महामार्गावरील लव्हाळा गावाजवळ बनवण्यात आलेला उड्डाणपूलाचे काम हे तांत्रिकदृष्ट्या योग्य झाले नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा संबंधित प्राधिकरणाकडून या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली. शिवाय बुलढाणा जिल्ह्यात भारतमाला योजनेअंतर्गत विविध महामार्गाचे काम झाले आहे त्यातील काही कामे ही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. वर्षभरात रस्त्यांना  तडे गेले आहेत या प्रकरणाची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी सोबतच निकृष्ट दर्जाच्या कामाचे पुन्हा नव्याने काम करावे अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव  यांनी यावेळी केली.शिवाय भारतमाला योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली जालना नागपूर व्हाया सिदखेडराजा मेहकर कारंजा नागपूर आणि मुंबई नागपूर व्हाया घोटी सिन्नर वैजापूर संभाजीनगर जालना मेहकर मालेगाव कारंजा नागपूर या महामार्गाचे सुद्धा तीन पदरीकरण करावे अशी मागणी खासदार जाधव यांनी केली आहे जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची उंची अधिक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे या संदर्भात संबंधित प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून काम करावे.अशी मागणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

Previous Post Next Post