नोकरशाहिच्या पारंपारिक विचाराला फाटा देत मुलांमध्ये स्वतःचे काहीतरी निर्माण करण्याचे उदात्त विचार विकसित करण्याच्या उद्देशाने स्थानिक आस्की किड्स पब्लिक स्कूल ने औद्योगिक क्षेत्रभेटीचे आयोजन काल रोजी केले होते.उद्योग विकासाला चालना देऊन मुलांमधील उद्यमशीलता वाढीस लागावी. नोकरशाहीचा भाग न बनता मुलांनी औद्योगिक परीक्षेत्राचा भाग बनून विकासवाटा निर्माण कराव्या. आणि त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला, उद्यमशील मूल्यगुणांना वाव मिळावा. या काही विशेष उद्देशांना घेऊन शाळेचे सचिव सन्मा. नितीनजी झाडे यांच्या संकल्पनेतून अमरावती येथे औद्योगिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्षेत्रभेट ही वर्ग ९ आणि १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये एकूण ४० विद्यार्थी सहभागी झाले होते.आयोजीत क्षेत्राभेटीत विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरची सर्वात मोठी ब्रँड म्हणून ओळखली जाणारी कपड्याची कंपनी *"रेमंड" (Raymond)* आणि *प्लास्टिक रिसायकल प्लांट* अशा प्रकारच्या कंपन्यांना भेट देऊन कच्च्या मालापासून ते पूर्णतः वस्तू बनून तयार होईपर्यंतचा प्रवास प्रात्यक्षिक रूपात अनुभवला. कुठल्याही पातळीवर कार्य करून आपल्या मालाची गुणवत्ता कशी कायम ठेवावी आणि त्यासाठी कुठल्या प्रकारचे वैज्ञानिक निकष पाळायचे याचा उलघडा मुलांनी केला.यावेळी व्यवसाय शिक्षणाचे महत्व आणखी चांगल्या प्रकारे अधोरेखित करण्यासंबंधीचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा झाडे मॅम यांनी केले. तर मुलांना औद्योगिक युनिटचे मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक म्हणून पवन सर, आशिष सर, पालेकर सर आणि मानकर मॅम यांनी काम पाहिले.
-------------------
"मुलांमधील औद्योगिक गुणांना वाव मिळावा त्यांनी भारत सरकारच्या *स्टार्ट उप आणि स्टॅन्ड उप* योजनेचा सक्रिय घटक भविष्यात बनावे. यासाठी आजच्या औद्योगिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते."
श्री. नितीनजी झाडे
सचिव, आस्की किड्स पब्लिक स्कूल अकोट..
