कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा संपन्न...शैक्षणिक प्रगतीकरीता मोबाईल पेक्षा अभ्यासात व्यस्त रहा - आ.डॉ.संजय कुटे..


 जळगाव जा प्रतिनिधी:-

कुणबी समाज कर्मचारी सेवा संघाच्या वतीने दि.7 ऑगस्ट रोज रविवारला सांस्कृतिक भवन जळगांव जा.येथे आयोजित २१७ विद्यार्थ्यांनच्या गुण गौरव व सेवानिवृत्त सत्कार समारंभात समाजातील प्रत्येकाची प्रगती साधायची असेल तर घरातील प्रत्येक विद्यार्थ्यांनं मोबाईल मध्ये व्यस्त न राहता अभ्यासात सतत व्यस्त असने आज काळाची गरज निर्माण झाली आहे असे उद्गार माजी मंत्री तथा जळगांव जा.मतदार संघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगांव जा.तालुका अध्यक्ष साहेबराव कळसकार होते,तर समारंभास आ.डॉ.संजय कुटे,आ.ॲड.आकाश फुंडकर (खामगांव मतदार संघ),संस्थापक अध्यक्ष अरूणभगत,उच्च विद्याविभूषित दिगांबर आळशी, कु.अंजलीताई टापरे(अध्यक्ष्या सं.गां.सह.सुत.गिरणी जळगाव),सौ.अपर्णाताई संजय कुटे,शिवशंकर  भारसाकळे साहेब (गटविकास अधिकारी), केदारभाऊ ढोरे(अध्यक्ष कु.वि.मं.नांदुरा), राजाराम काळणे(अध्यक् सं.तु.म.कु.वि.म.खामगांव), गुलाबराव महाले(अध्यक्ष कु.वि.म.बुलडाणा),वाल्मीकराव ठाकरे(अध्यक्ष कु.वि.मं.जळगांव),डॉ.निलेश टापरे(वैद्यकीयअधीक्षक, खामगांव) रामदास पांडव गुरूजी,विश्वनाथ तिडके,नारायण फाळके(गटशिक्षणाधिकारी),कु अनुजा काळमेघ सहायक मोटर वाहन निरीक्षक,रामकृष्ण जवकार साहेब,प्रा.मधुकर वदोडे,रुस्तमराव होनाळे,अभिषेक जवकार (डेप्युडी इंजिनिअर बुलडाणा),प्रा.एकनाथ हेलगे सर,वसंत वारूकार, डॉ.नंदकिशोर महल्ले,सौ.रत्नप्रभा पारधी,कु.पुष्पा कसुरकार,श्रीमती आशालता वासुदेव मुऱ्हे,गजानन वानखडे साहेब, नारायण भुंबरे, कैलास फाटे,हरिदास आखरे,रघुनाथ कौलकार स्वागताध्यक्ष तथा उपाध्यक्ष,परमेश्वर सरदार (संस्थापक अध्यक्ष कुणबी युवा मंच),लक्ष्मणराव मुंडे संस्थापक कार्याध्यक्ष,शंकर सुरतकार, नितिन भालेराव,शिवहरी घ्यार,अनिल हरणे,प्रा.डॉ.रामकृष्ण भारसाकळे,संतोष आळशी,गजानन मानस्कर, गणेश गिऱ्हे,अनिल महल्ले,रामेश्वर पारधी,सुभाषराव टाले,रामेश्वर घोराडे,सुभाष फेरंग, ,शांताराम साबळे स्वागताध्यक्ष तथा आदी मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या व कुलवाडीभुषण छत्रपती शिवाजीमहाराजांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आल.कार्यक्रमात पुढे बोलतांना आ.डॉ.संजय कुटे म्हणाले की,समाजातील हुशार विद्यार्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे महत्वाचे असते ते कार्य कुणबी समाज कर्मचारी सेवा संघ 7-8 वर्षापासून करीत आहे, ही बाब गैरवास्पद आहे.कर्मचारी सेवा संघाने आज रामेश्वर जोहरी यांची राज्य अध्यक्षपदी निवड करून एका व्यापक कार्यास सुरवात केल्याबद्दल त्यांनी संस्थापक अध्यक्ष अरुण भगत  व कार्यकारणीचे अभिनंदन केले.सत्काराला उत्तर देतांना उच्चविद्याविभूषित दिगांबर आळशी यांनी आजतागायत माझे अनेक स्त्कार झालेत पण आज झालेला परिवारातील सत्कार माझ्या साठी विशेष आहे व आपल्या जीवनात असलेल्या परिस्थितीत आनंद शोधा व समाधानात जीवन जगत आनंद निर्माण करा असे उद्गार काढले.नारायण फाळके साहेब यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेबाबत मार्गदर्शक केले.नारायण भुंबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दिगांबर आळशी,अनुजा काळमेघ,शुभम बहाकर, अभिषेक जवकार,प्रा.मधुकर वडोदे,रुस्तमराव होनाळे, प्रा.डॉ.हरिदास आखरे,प्रा.डॉ.रामकृष्ण भारसाकळे यांचा विषेश सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देतांना कु.अनुजा काळमेघ ने मी आज व्यासपीठावर आहे पण काही वर्षांपूर्वी तुमच्या सारखीच खाली बसलेली होती पण त्यावेळेस कर्मचारी सेवा संघाकडून जे प्रोत्साहन मिळाले त्यामुळेच मी माझ्या अभ्यासात सातत्य ठेवू शकले याचा मला अभिमान  आहे.संस्थापक अध्यक्ष अरुण भगत यांनी मनोगत व्यक्त करतांना कोणत्याही संस्थेत व संघटनेत काही वर्षांनी परिवर्तनशीलता असली पाहिजे, संस्था किंवा संघटना व्यक्तीगत होता कामा नये असे उद्गार काढून राज्य संघटनेच्या अध्यक्ष पदी मान्यवरांच्या उपस्थितीत रामेश्वर जोहरी यांची निवड जाहीर केली. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव कळसकार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक सचिव रामेश्वर जोहरी सर,सुत्रसंचालन संस्थापक कैलास भोजने,दिपक फाळके,गजानन खारोडे,सोपान गोंड,  यांनी सुत्रसंचालन तर आभारप्रदर्शन कु.पुष्पाताई कसुरकार ता. अध्यक्षा यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक जिल्हा कार्यकारणी व सर्व तालुका अध्यक्षांनी व कार्यकारण्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post