जळगांवात 19 वर्षिय तरूणीचा विनयभंग...आरोपीविरुद्ध जळगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्थानिक जळगांव जामोद येथे दिनांक 4 आँगष्ट रोजी एका 19 वर्षिय तरूणीचा घरात घुसून  बंधन बँकेच्या पैशाची वसुली करणाऱ्या नितीन कापडे या युवकाने सदर मुलीला पाठीमागून येऊन कवट्यात पकडुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सविस्तर असे की जळगांव जामोद शहरात राहणाऱ्या तक्रारदार युवतीच्या आईचे जळगांव येथीलच बंधन बँकेत बचत गटाच्या माध्यमातून खाते असुन त्या बँकेचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे बंधन बँकेमधुन महिन्याला एक वसुली कर्ता कर्मचारी पैसे आणण्यासाठी येत असतो.दिनांक 4 आँगष्ट रोजी फिर्यादीची आई सकाळी गिरणीत कामाला गेली असता.बंधन बँकेत  चा वसुली अधिकारी नितीन कापडे हा घरी गेला व आवाज देऊन बचत गटाचे पैसे मागु लागला सदर फिर्यादीने सांगितले आई कामाला गेली आहे असे सांगितले असता नितीन कापडे याने सदर तरुणीला पाणी प्यायला मागितले. पाणी देऊन सदर तरुणी ग्लास ठेवायला गेली असता आरोपी नितीन कापडे याने सदर तरुणीला वाईट उद्देशाने पाठीमागून पकडले.तरूणीने आरडाओरडा केली असता बाथरूममध्ये गेलेले पिडीत तरूणीचे वडील धावुन आले व त्यांनी पिडीतेला आरोपीच्या ताब्यातुन सोडले.सदर तरुणीने वडिलांसह जळगांव पोलीस स्टेशन गाठुन घटनेची फिर्याद दिली अशा पिडीत तरूणीच्या फिर्यादिवरून जळगांव जामोद पोलिसांनी आरोपी नितीन कापडे याच्याविरुद्ध कलम 354,354A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीला जळगांव पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे व योगेश निंबोळकर करीत आहेत.

Previous Post Next Post