प्लान इंडिया आणि रेक्कीट चे Reach Each Child प्रकल्पा अंतर्गत स्तनपान सप्ताह कार्यक्रम उत्साहाने आणि यशस्वीरीत्या संपन्न...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

सुरु असलेल्या स्तनपान सप्ताह च्या अनुषंगाने प्लान इंडिया रेक्कीट ने Reach Each Child प्रकल्प अंतर्गत दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी, आदिवासी सांकृतिक भवन चुरणी, चिखलदरा, अमरावती येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात स्तनपान, आहार, आणि विविध आरोग्याच्या विषयावर डॉ. वर्मा - RH चुरणी आणि डॉ. माहुलकर - PHC काटकुंभ यांनी मार्गदर्शन केले. व अशा माता ज्यांनी त्यांच्या आजारी बालकांसाठी वैद्यकीय सल्ला ऐकून बालकांना वैद्यकीय सेवा घेतली त्यांचा REC ट्रॉफी व गुडी bag देऊन सत्कार केला. तसेच जमिनी स्तरावर कार्य करणारे योद्धा म्हणजेच आशा ताई आणि अंगणवाडी सेविका ज्यांनी संस्थागत प्रसूती आणि बालकांना CTC/ NRC येथे संदर्भित करण्यासाठी जे यशस्वी कार्य केले त्यांना स्तनपान सप्ताह च्या अनुषंगाने REC स्तनपान सप्ताह ट्रॉफी व गुडी bag देऊन सत्कार केले तसेच आशा सुपरवायझर चंद्रकला कवडे आणि लता येवले यांचा हि उत्तम कार्यासाठी सन्मान केला.  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामदेव वर्मा, डॉ. रागेश्री माहुलकर, श्रीमती. सुमिता दारसिम्बे सरपंच चुरणी ग्रामपंचायत, श्रीमती. कुरेशी सिस्टर, डॉ/ पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन श्रीमती कोमल गोस्वामी, श्री अंकित बहल, श्री दत्तात्रय सोनगरे, ब्लोक ऑफिसर सुरज पवार यांनी केले.

Previous Post Next Post