कवडाझिरी येथे गैस सिलेंडरचा स्पोट..एक घर जळुन खाक, जिवीत हाणी थोडक्यात बचावली...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

धारणी मुख्यालयापासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावरील कवडाझिरी गावामध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एका घराची राखरांगोळी झाली असून या स्पोटमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी सुदैवाने झाली नसल्याची माहीती प्राप्त झाली आहे.प्राप्त माहीतीनुसार कवडाझिरी निवीसी सुरज किसन जांबेकर वय 32 वर्षे यांच्या घरात अचाणक शनिवारी सकाळच्या सुमारात गैस सिलेंडरचा स्पोट झाला. स्पोट एवढा भयानक होता की क्षणातच आग लागुन संपूर्ण घराची राख रांगोळी झाली.सुदैवाने सुरजच्या घरात उपस्थित त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी घराबाहेर पडून आपल्या जीवाची सुरक्षा केली. सनद असो की, धारणी तालुक्यात उज्वला गॅस योजनेअंतर्गत गैस विवीध एजन्सीद्वारे गॅस किटचे वाटप करण्यात येते. मात्र सदर गॅस किट मध्ये वापरण्यात येणारे साहित्य ज्यामध्ये रेगुलेटर,पाईप व शेगडी इत्यादी अत्यंत निकृष्ट दर्जाची वाटप केल्या गेल्यामुळे मेळघाटात अधून मधून असे अपघात घडत असतात. हा अपघात सुद्धा याच कारणाने घडला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना मिळतात त्यांनी तात्काळ धारणी नगरपंचायतला सूचना देऊन अग्निशमन दलला पाचारण केले. कवडाझिरी गावातील नागरिकांनी तारेवरची कसरत करून आग विझविण्यात यश संपादन केले होते,तसेच अग्निशमन दल सुद्धा तात्काळ कवडाझिरी पोहचली व आगीवर पूर्णतः नियंत्रण करण्यात आले. आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी पोहोचून सुरज जांबेकर यांच्या घराची पाहणी केली, सुरज जांबेकर याच्या घराचा पंचनामा करुन तात्काळ शासनाकडून सहानुग्रह निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित प्रशासनाला निर्देश दिले असून लवकरच लाभ दिल्या जाणार असल्याचे आश्वासन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिले आहे.

Previous Post Next Post