एकफळ ते आळसणा रस्ता लवकरच पुर्ण होणार – आ ॲड.आकाश फुंडकर..एकफळ रस्त्यासाठी भाजपा युती सरकारच्या पहिल्याच अर्थ संकल्पात रु.3.50 कोटी रुपए मंजूर..भूसंपादना अभावी रस्त्याचे काम रखडले...


सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी R.C24 न्यूज

खामगांव विधानसभा मतदार संघातील मौजे एकफळ  ते आळसणा हा रस्ता मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे.  प्रमुख जिल्हा मार्ग क्र.7 मधील उर्वरीत 800मिटरची लांबी ही भूसंपादनाअभावी होऊ शकली नाही.  याबाबत सतत पाठपुरावा केला असून त्याबाबत अनेक वेळा संबंधीतांशी चर्चा देखील केली. परंतु भूसंपदानासाठी निधी नसल्यामुळे सदरचा रस्ता रखडला होता. परंतु राज्यात भाजपा युतीची सरकार आल्याबरोबर सदरचा रस्ता पहिल्याच अर्थसंकल्पात मंजूर करुन घेतला आहे.खामगांव विधानसभा मतदार संघातील मौजे एकफळ ते आळसणा या रस्त्याच्या उर्वरीत 800मिटर  रस्ता यावर्षी 2022-23 अर्थसंकल्पात मंजूर झाला असून त्यासाठी रु.3 कोटी 50 लाख एवढा निधी मंजूर झालेला आहे.  त्यामुळे या रस्त्याचे भूसंपादनाचे काम लवकरच पुर्ण होऊन या रस्त्याला प्रत्यक्ष सुरवात देखील होणार आहे.एकफळ आळसणा हा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. सदरच्या कामासाठी स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात  रु.40.00लक्ष निधी मंजूर देखील करण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे क्रॉसींग पार करावे लागत असल्यामुळे याठिकाणी  रु.80 लक्ष रुपयांचा पुल देखील बांधण्यात आला आहे. मागील अडीच वर्षापासून राज्यात भाजप युतीची सत्ता नसल्यामुळे सदरच रस्ता निधी अभावी प्रलंबीत राहीला होता. यापुर्वी देखील हा रस्ता  आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या सुचनेनुसार 4 वेळा अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला होता.  परंतु तो मंजूर होऊ शकला नाही.   यावर्षी राज्यात भाजपा युतीची सरकार येणाच आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी सदरचा रस्ता अर्थसंकल्पात प्रस्तावीत केला व त्यास मंजूरात देखील मिळाली आहे.  या रस्ता कामाचे सरळ खरेदीने भूसंपादनाचे काम सुरु झालेले असून भूसंपादन झाल्याबरोबर सदरच्या रस्ता कामाला सुरुवात होणार आहे.त्यामुळे एकफळ ते आळसणा हा रस्ता लवकरच पुर्ण होणार असून विद्यार्थी-विद्यार्थीनीं, तसचे गावकऱ्यांना स्वातंत्र काळापासून होत असलेल्या त्रासापासून सुटका होणार आहे, असेही यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले.त्यांनी शेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली .

Previous Post Next Post