समाज क्रांती आघाडी तर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे स्वागत.. तसेच भारत जोडो यात्रेचेही करणार स्वागत...


 सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...

आज भारतामध्ये लोकशाही बंदिस्त करून हुकूमशाहीने जागा घेतली आहे.यासाठी विरोधी पक्षाकडून जनता अपेक्षा करीत आहे.काॅंग्रेस पक्षाच्या वतीने भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत पदयात्रा काढण्यात येत आहे.अकोट येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नाना पटोले आले असता समाज क्रांती आघाडीच्या वतीने भारत जोडो यात्रेचे स्वागत केले.यावेळी समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांनी पटोले यांना स्वागत पत्र दिले.यावेळी प्रदेश संघटक प्रा.दयावान गव्हाणे, समाज क्रांती आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे,डाॅ.प्रभाकर नगराळे, विष्णू वाडेकर राज्य कार्यकारणी सदस्य, देविदास वर्घट,रुपेश बोंडे,शेखर वर्घट,संजय खंडारे, युवराज यादवार,अहेमद सर आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post