जिल्ह्यात एकाच ठिकाणी सार्वजनिक शिक्षक दिन केला गेला साजरा...चिखली येथे 36 शिक्षक शिक्षिकेचा केला गेला सत्कार...

अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष...

यावेळेस जिल्ह्यात शिक्षक दिनाला जास्त महत्व दिल्या गेले नसल्याचे चित्र आहे, दरवर्षी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी ओरत्येक शाळेत साजरा केला जात होता मात्र यावर्षी तसे होताना दिसले नाही, राज्यातील राजकीय घडामोडी, ढवळलेले वातावरण तसेच जिल्ह्यातील गढूळ राजकारण यामुळे शिक्षक दिन मागे पडला व विसरले सुद्धा, मात्र चिखली आमदार श्वेता महाले यांनी पंचायत समितीच्या सभागृहात शिक्षक दिन साजरा केला व चिखली तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षण देणारे व विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या 36 शिक्षक व शिक्षिकेचा सत्कार करून सन्मान केलाय... 

गुरूर्ब्रम्हा गुरुर विष्णू गूरुर देवो 

गुरू हा साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः .....

साक्षात परब्रम्ह जर कोणी असेल तर तो शिक्षक आहे, भारतीय परंपरेतील "गुरू शिष्य "ही भारताने जगाला दिलेली महान परंपरा आहे. असे वक्तव्य करित चिखली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा  विकासाचा कृती आराखडा तयार करणार असल्याचे आ श्वेता महाले यांनी सांगितले प्रत्येक गावातील नागरिक लोकप्रतिनिधींकडे विविध समस्या घेऊन येतात व त्यासाठी निधीची मागणी करतात परंतु दुर्दैवाने त्यामध्ये शाळांच्या विकासाच्या समस्यांचा समावेश नसतो . परंतू मी स्वतः  लक्ष घालून चिखली विधानसभा मतदारसंघातील जि प शाळांच्या विकासाचा कृती आराखडा तयार करणार असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये तो पूर्णपणे त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविले

Previous Post Next Post