अकोट नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन कामाचे अंदाजपत्रक 3 कोटी 54 लाख 33 हजार 300 रुपयांचे असून सदर कचराटदार अमरावती येथील दीपक उत्तरांची यांना पाच टक्के कमिशन मंजूर करण्यात आले आहे त्यांना जुलै महिन्यात वर पावडर देण्यात आले असून त्यांनी 2020 21 या वर्षाची निविदा 26 टक्के कमी दराने घेतली होती तसेच 2022 23 ची निविदा अंदाजपत्रकीय रक्कम जास्त आहे व मागील नियोजन तुलनेत केवळ पाच टक्के दराने निर्धाव मंजूर करण्यात आली असून पत्रात दराला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे असे असताना कत्रातदारांनी गेल्या दोन महिन्याचे काम नगर परिषद सोबत करारानुसार काम करीत नसल्याचे दिसून येते, आकोट शहरातील घरोघरचा हॉटेलचा बाजारपेठेतील नगरपालिका परिषदेच्या भाजी मार्केट कत्तलखाना व आठवडी बाजार या ठिकाणचा ओला व सुका कचरा तसेच या व्यतिरिक्त इतर भागात पडलेला व गोळा होणारा संपूर्ण शहरातील कचरा दररोज संकलन व वाहतूक करून त्यावर प्रक्रिया करणे जबाबदारी ठेकेदाराची असून. कचऱ्याची वाहतूक करून कचरा डेपोवर विल्हेवाट लावणे आवश्यक असते त्याकरिता मनुष्यबळ सुरक्षा साधने व यंत्रसामग्री इत्यादी व्यवस्था कचरा दराने करणे आवश्यक आहे परंतु वरील सर्व भागातील कचरा ठेकेदारा कडून साफ केल्या जात नाही, त्यामुळे कचरा ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे शहरांमध्ये दुर्गंधीचे वातावरण असून यामुळे विविध आजार होण्याची चिन्हे आहेत, आठवडी बाजारातील कचरा गेल्या दोन महिन्यापासून उचलला गेला नाही. तसेच मागील 46 दिवसापासून जीपीएस मॅप कॅमेरा द्वारे दुपारी तीन नंतर काढलेले कचऱ्याच्या ढगाचे तीस चाळीस फोटो मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांच्या इमेलवर दररोज टाकले आहेत मागील तीन महिन्यापासून कचरा उचलला गेला नसल्यामुळे त्या ठिकाणी 25 ते 30 ट्रॉली कचरा पडलेला आहे तसेच दिनांक 8 सप्टेंबर रोजी लहान तीन चाकी ऑटो पाठवून फळबाशीच्या पिशव्या उचलून त्यांची सेल्फी काढून मुख्याधिकारी यांना दाखवली आहे. तसेच कचरा डेपोवर कचरा प्रक्रिया करण्याची कोणती सुविधा उपलब्ध नाही, ओला व सुका कचरा वेगवेगळ्या ठेवून नागरिकांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना तशी जनजागृती करण्यात येत नाही. तसेच गावामधून फिरणाऱ्या घंटागाड्यांचे स्पीकर नादुरुस्त असल्यामुळे गाड्या कधी येतात हे नागरिकांना समजत नाही. घंटा काढायची दुरुस्त झाली असून त्या नादुरुस्त आहेत तरीही संबंधित कत्राटदाराला पूर्ण बिल मिळते त्यामुळे नियमानुसार अटी शर्थीनुसार ठेकेदारा कडुन काम करून घेण्यात यावे. का व्यवस्थित करीत नसल्यामुळे संबंधित कट्टरात दारावर दंडात्मक कारवाई करून दंडाची रक्कम त्याचे बिलाच्या रकमेतून कपात करण्याची मागणी दिनांक 27 जुलै रोजी केली होती त्याच्यावर अद्याप पर्यंतही कारवाई करण्यात आलेली नाही अशा आशयाची तक्रार माजी नगरसेविका नगमा अंजुम यांनी केली आहे.
माजी नगरसेविका नगमा अंजुम यांनी घनकचरा व्यवस्थापन कामाचे करानुसार काम होत नसल्याने ठेकेदाराच्या बिलातून रक्कम करात करण्यासाठी दिले निवेदन...
सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...