चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ या गावात पोषण माह कार्यक्रमामध्ये माता व बालक यांच्या पोषणाविषयी व चांगल्या सवयी, विविध स्पर्धातून पोषण आणि आरोग्याविषयी योग्य माहिती देण्यात आली, जसे पोस्टर प्रतियोगिता, प्रश्न मंजुषा, पोषण खेळ, पोषण rally, आरोग्य ज्ञान संगीत खेळ इ. चा समावेश करण्यात आला. विजेत्या मातांना परसबाग / पोषणबाग लावून हिरव्या इ पौष्टिक पालेभाज्या लावनेसाठी परसबाग ची बियाणे देऊन प्रोत्साहित करण्यात आले तसेच बालकांच्या अंगी असणारे कौशल्य विकसित होईल या दृष्टीने विजेते बालकांना drawing book, color पेन्सिल, sharpner इ. बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमात गावातील गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली तसेच अंगणवाडी सेवीका गीता धिकार, ललिता धुर्वे, रामकली धिकार (आशा सेविका), फुलय सावलकर ( आशा सेविका) उपस्थित होते व पोषण माह आणि लसीकरण मध्ये समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय ठोसर. डॉ. मनोज दाणे, सबल संस्था क्षेत्रीय समन्वयक चुरणी मनीष येवले, एनिमेटर - सिताराम सेलूकर, राहुल जामूनकर, एम. पी. डब्ल्यू अरविंद वानखडे, ए. एन. एम निरंजना बछले, शिल्पा बन यांनी हेल्थ चर्चा मध्ये गरोदर माता आणि स्तनदा माता तसेच अन्य सहभागींना आरोग्य व पोषण विषयक सल्ला मार्गदर्शन केले. तसेच सी. एन. डब्ल्यू मोहिनी उईके, रिता परते, कविता रेचे, सोनम बेठेकर यांनि विवीध पोषण खेळ च्या माध्यमाने मातांना पोषण विषयी माहिती दिली. सदर महिनाभर कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन डॉ. कोमल गोस्वामी, डॉ. अंकित बहल, श्री. दत्तात्रय सोनगरे, सुरज पवार ब्लॉक ऑफिसर यांनी केले.
रिच .इच. चाइल्ड प्रकल्प तसेच आय. सी. डी. एस विभाग व आरोग्य विभाग - प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ व सबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह आणि लसीकरण...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...