अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी अहवाल लवकर देण्याची भाजपाची निवेदनाद्वारे मागणी...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

गेल्या तीन चार दिवसा पासून सतत सुरू असलेल्या चक्री वादळसह अतिवष्टीमुळे मुळे जळगाव जामोद तालुक्यातील  पिंपळगाव काळे महसूल मंडळातील दादुलगाव, मांडवा, पळशी सुपो, खांडवी  तसेच  आसलगाव, वडशिंगी, जामोद महसूल मंडळ येथील  अनेक गावातील शेतातील  पिकांचे झालेल्या नुसकानीचे तसेच काही ठिकाणी  घरांच्याही झालेल्या पडझडी ची  गाव निहाय कृषी विभाग व इतर विभागच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सामूहिक स्पॉट पंचनामा करून अतिवष्टीमुळे  झालेल्या नुकसानीचा अहवाल शासन दरबारी सादर करण्यात यावा त्यासाठी जळगाव जामोद येथील तहसीलदार शितलताई सोलाट व नायब तहसिलदार मार्तंड ह्यांना प्रत्यक्ष भेटून तश्या सूचना आज माजी विरोधी पक्ष नेते जिल्हा परिषद बुलढाणा बंडू पाटील ह्यांनी दिल्या हा वेळी भाजपा ता.अध्यक्ष प्रकाश वाघ, भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष परिक्षीत ठाकरे, ता.सरचिटणीस रवि पाटील पाचपोर, रामा इंगळे , भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन उमाळे सह इतर शेतकरी हजर होते

Previous Post Next Post