जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यामध्ये दिनांक 10 व 11 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान वारा ऊधानामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले कपाशी मका ज्वारी तसेच फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी रोजी शेतकऱ्यांनी लावलेला खर्च सुद्धा भरून येईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.या अस्मानी संकटामुळे पहिल्यांदाच मोडकळीस आलेला शेतकरी आज रोजी पूर्ण कोसळून गेलेला आहे.तरी शेतकऱ्यांना उचित न्याय मिळावा म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने जळगाव जामोद च्या तहसीलदारांना एक निवेदन देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्काळ मदत होणे गरजेचे आहे. व पंचनाम्यांची अट न ठेवता नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आलेली आहे.निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत अनंत बकाल संजूभाऊ धुळे,शिवचरण पाटील नारायणभाऊ धुर्डै,अनिल भगत,समाधान भाऊ नानकदे सह शेतकरी उपस्थित होते.सरकारने मोडकळीस आलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तीचे बंधन न ठेवता तात्काळून मदत करून शेतकऱ्याला सावरावे असे मागणी निवेदन देतेवेळी रमेश बानाईत यांनी केली आहे.