जळगाव जामोद तालुक्यामध्ये दिनांक 10 सप्टेंबर व 11 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच वादळीवाळ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले कपाशी मका ज्वारी यासारखी पिके अतिवृष्टीमुळे खराब झाली. त्यामुळे शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सरसकट भरपाई मिळावी व राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर मोठे संकट उद्भवलेले आहे त्याकरता त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत मोठ्या प्रमाणात लंपी रोग प्रतिबंधात्मक लसीकरणाचे मोफत शिबिर घेण्यात यावे तसेच काही ठिकाणी प्रायव्हेट डॉक्टर ह्या लसी देण्यासाठी पशु मालकांजवळून पन्नास रुपयांपासून दोनशे रुपये उकळत आहेत त्यामुळे यावरही प्रतिबंध करण्यात यावा याकरिता दिनांक 13 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देतेवेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुकाप्रमुख गजानन वाघ, शहर प्रमुख रमेश ताडे,अशोक टावरी,कैलाससिंह राजपुत,नरेंद्र काळे,युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील,मुस्ताक भाईजान, विशाल पाटील,पांडुरंग उगले,राजेंद्रसिंह परिहार, गजानन मोरे,चांद कुरेशी,युवराज देशमुख यांच्यासह बहुसंख्या शिवसैनिकांची यावेळी उपस्थिती होती.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-