जळगांव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे,आसलगाव,वडशिंगी,व जामोद महसूल मंडळात गेल्या ४-५ दिवसापासून होत असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे, वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.शेतातील कपाशी ,मका,सोयाबीन व इतर पिके अक्षरशः पावसामुळे भुईसपाट झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून घेतला आहे.शासन दरबारी या संदर्भात कुठलेही ठोस पाऊले उचलतांना दिसून येत नाही.संबंधित यंत्रणेला तात्काळ सूचना करून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी.परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांची पीकविमा कंपनीकडून आपल्या पिकांचा पीकविमा उतरवलेला आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतांना सुद्धा कुठल्याही पीकविमा कंपनीकडून किंवा सरकारी यंत्रणेकडून त्यांची दखल संबंधित माहितीपत्रक अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आले नाही ते सुद्धा त्वरित जाहीर करण्यात यावे.तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५०००० रु. ची मदत करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोदच्या वतीने करण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष पराग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, जिल्हा अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष एम डी साबीर, राष्ट्रवादी युवक चे आशिष वायझोडे,इरफान खान, दत्ता डिवरे विधानसभा अध्यक्ष,अनुप महाले, तालुका अध्यक्ष,फिरोज खान जिल्हा उपाध्यक्ष,योगेश बोराखडे तालुका कार्याध्यक्ष, शेख ताहेर शहराध्यक्ष,रोहित पवार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,अविनाश यादगिरे,निखिल पाथ्रीकर,निझाम राज,भूषण चौधरी,रामदासजी वाघमारे ,सुहास वाघ,संतोष जवरे,संभाजी ठाकूर ,संतोष बापू देशमुख,प्रकाश सोनोने, रामा पारस्कर,शैलेश दैय्या, दादाराव धंदर ,शत्रुघन उगले, विलास उगले, मनोज उगले, प्रकाश भोलनकर, अविनाश झाल्टे, सुरेश मुळेकर,विशाल वाघ,मंगेश वाघ, सोपान उगले, विजय खराटे, परशुराम पाटील, विलास झाल्टे, वसंतराव यादगिरे ,प्रवीण उगले, गोपाल सुरळकर ,किसन अहिर,रामेश्वर टेकाळे, पुरुषोत्तम वानखडे,मोहम्मद खालिद,दानिश सैयद,फुरकांन खान,रामेश्वर पोटे,सियाद उमेद, बहुसंख्य शेतकरी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करून हेक्टरी ५०००० रु. नुकसान भरपाई द्या-पराग अवचार युवक जिल्हा कार्याध्यक्ष
जळगांव जा.प्रतिनिधी:-