शिवसेना शिंदे गट जळगाव शहर प्रमुख तसेच जिल्हा परिषद सर्कल निहाय शिवसेना तालुका उपप्रमुखांचे नियुक्त्या ह्या जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाप्रमुख शांताराम दाणे,उपजिल्हा प्रमुख राजु मिरगे यांचे हस्ते काल शेगाव तालुक्यातील भास्तन येथील आयोजित बैठक दरम्यान करण्यात आल्या. यावेळी शिवसेना जळगाव तालुका प्रमुख अजय पारस्कर,नंदु पाटील, गजानन देशमुख,बाळु पाटील,शिवा वाघ यांची उपस्थिती होती.नवनियुक्त शहर प्रमुख पदी अरुण पांडुरंग ताडे जळगाव, जि.प.सर्कल जामोद तालुका उपप्रमुख पदी संजय पांडुरंग धुळे,जि.प.सर्कल पिपळगाव तालुका उपप्रमुख पदी विठ्ठलसिह शामरावसिह चव्हाण,वडशींगी जि.प.सर्कल तालुका.उपप्रमुख पदी विजय सारंधर शित्रे तर विभाग प्रमुख पदी दिपक माजरे यांची तर जामोद सर्कल विभाग प्रमुख पदी गोपाल रामेश्वर मानकर यांची नियुक्ति करण्यात आली.लवकरच आसलगाव जि.प.सर्कलच्या तालुका उप्रमुख पदी संतोष भाकरे यांची व बाकी विभाग प्रमुख यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रमुख शांताराम दाने ह्यांनी दिली.
अरुण ताडे ह्यांची शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव शहर प्रमुख पदी नियुक्ती...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-